भारतीय जन प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या परंतुक २९अ या अनुसार भारतीय निवडणूक आयोग यांनी अधिस्वीकृती दिल्याप्रमाणे दिनांक २९.०२.२०१६ रोजी भारतीय गणराज्याच्या व्यासपीठावर एका नवीन आणि चैतन्यपूर्ण लोकचळवळीचे असिधाराव्रत घेतलेल्या पक्षाची मुहूर्त मेढ रोवल्या गेली असून त्याचे नामाभिधान “केंद्रीय जनविकास पार्टी” असे झालेले आहे.

भारतातील जनसामान्यांच्या आणि बुद्धीजनानी महिमामंडीत केलेल्या व ज्यांच्या ध्येय धोरण दिशा यांचे अनुसरण व अंगीकारकरीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सर्व धर्म समभाव जपणारे आधुनिक समाजाचे जाणते राजे, धार्मिक अधिष्ठानाला प्रभावी सामाजिक अधिष्ठान देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची अन्तः प्रेरणा, समाज महर्षी राजर्षी शाहू महाराज,शिक्षण चळवळीचे उद्गाते मा.ज्योतीबा फुले,,सावित्रीबाई फुले,संपूर्ण जगात भारतीय संघराज्याची गणराज्य म्हणून ओळख व दिशा ठरवणारे घटना शिल्पकार दीनदलित दुखी वंचीताना दिलासा देणारे आणि त्याची ओळख समाज मान्य ठरविणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, व भारतीय समाजमन गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्याची प्रेरणा देणारे आणि आझाद हिंद सेना स्थापन करून भारतीय गणराज्याची जागतिक व्यासपिठावर पहिली नांदी देणारे रणधुरंदर सुभाष चंद्र बोस यांची प्रेरणा, विचार व तत्वे आणि जनकल्याणाची चळवळ यांचा वसा घेत सामाजिक पुनरुत्थानाची बांधिलकी स्वीकारीत अहोरात्र कार्यरत राहण्याची जनतेप्रती समर्पणाची भावना घेऊन लढा देण्याची,नेतृत्व साधण्याची हि पार्टी उद्येश्य रुपात स्वीकारीत आहे.

समाजाला दिशा देणारे नेतृत्व करणे प्रभावी जनसंघटन करणे व त्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चाली रिती, रूढी, परंपरा, भेदाभेद, उच्चनीचता यांबाबत काटेकोर दृष्टीकोन ठेवीत बदल घडवीत निकोप ,सुदृढ व एकसंघ समाज स्थापित करणेसाठी संपूर्ण ९० टक्के समाजकारण करण्यास्तव आवश्यक तेवढे कार्य आणि निमित्य मात्र राजकारण या भूमिकेतुनच हे आधुनिक ,पुरोगामी,सर्व समावेशक आणि भविष्याचा वेध घेणारा प्रगतशील भारत जगाच्या नकाशावर स्पष्ट व्हावा व आज दिसणारी अनागोंदी,दिशाहीनता,माजणारे वर्थ वादविवाद,समाजाची प्रगती कुंठीत करणाऱ्या चळवळीना लगाम घालीत प्रभावी दिशादिग्दर्शन हे आमचे साध्य असून त्याकरिता आवश्यक ते सर्व प्रयत्न पार्टीच्या माध्यमातून घडविण्यात येईल.

हे सर्व करण्यास्तव,घडविण्यास्तव,उमलते,सळसळते आणि तेवढेच तेजस्वी राष्ट्भानाने भारलेले आपले युवक युवती यांना समसमान नेतृत्वाची संधी देत गरजेनुसार पाठींब्या करिता, दिशादिग्दर्शना करिता, वरिष्ट नेतृत्वाची किंबहुना आशीर्वादाची फळी या पार्टीच्या माध्यमातून उभारण्यात येईल याकरिता एकूण नेतृत्वाच्या ४० टक्के तरुण युवक, ४० टक्के महिला व युवती आणि २० टक्के वरिष्ठ नेतृत्व यांच्या संमिश्र माध्यामातून पार्टी वाटचाल करील.

सध्या आपल्या देशात विकासाचे वारे मोठ्या जोमाने वाहत आहे किवा ते वाहत आहे असा आभास निर्माण करून जनतेला त्यांच्या प्राथमिक गरजा गौण ठेवीत विकासाच्या प्रक्रियेत सामील होण्याचे आव्हान केले जाते शासन स्तरावर ठरविलेली विकास कामे त्यांची प्राथमिकता,याबाबत समाजाला विश्वासात न घेता विकास कामाची गरज पटवून न देता ती एकांगी पद्धतीने राबविण्याचा प्रघात पडलेला आहे.वास्तविकता ते समाजाच्या भूमिकेतून व जनसामन्यांच्या अपेक्षांची पूर्ती होईल हा उद्येष्य समोर ठेऊन वाटचाल करण्याची आमची प्रमुख भूमिका आहे.विकास कामे करताना किवा विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरविताना जनतेच्या अपेक्षांची बूज राखत व त्यांना त्यात सामील करून घेत त्यांच्या डोळस निगराणी खाली निर्दोष कामे घडविण्याचे व त्यामाध्यमातून पार्टीची जनकल्याणकारी भूमिका समाजापर्यंत जास्त सुस्पष्ट रीतीने पोह्चण्यास्तव आमचा आग्रह राहील

सध्या आपल्या आजू बाजूला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या घटना घडत व गाजत असून त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आढळून येत आहे मात्र अंमलबजावणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना या तोकड्या आढळून येतात त्यामुळे कायद्याची अप्रतिष्ठा होत असून समाजातील अस्तित्व धोक्यात येत आहे.भ्रष्टाचार हि सामाजिक कीड असून तिचा प्रादुर्भाव न होऊ देणे यास्तव काळ मर्यादेत प्रभावी प्रतीबधात्मक उपाय योजना राबविण्याकडे, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याकडे आमच्या पार्टीचा कल आहे मात्र नुसताच कल आहे असे नाही तर त्याला अधिष्टान देणारे प्रभावी चिंतन पण आहे कोणताही व्यक्ती वा व्यक्तीसमूह यां प्रती कोणत्याही परिणामांचा मुलाहिजा न बाळगता वेळेत व प्रभावी कार्यवाही हेच आमचे कृती उदिष्ट्य राहील.

आपल्या देशात लहरी हवामानामुळे कृषी क्षेत्र न भूतो न भविष्यती अश्या गंभीर संकटात अडकलेले आहे या संकटाचा विचार करता काही मूलगामी कामे होणे अतिशय गरजेचे आहे ज्यात पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण, हवामानाच्या तुलनेमध्ये पिक नियोजन, शेतीच्या पद्धतीमध्ये शास्त्रीय संशोधन त्याचप्रमाणे शेती हा आश्वासक उद्योग कसा होईल आणि त्या माध्यमातून शेतकरी संपन्न कसा होईल हे पाहणे नुसतेच आपले कृती उदिष्ट्य नसून सामाजिक बांधिलकी सुद्धा आहे.तेव्हा ज्या प्रमाणे एकेकाळी आपण हरित क्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले त्याप्रमाणे शेती हा उद्योग कसा होईल व त्यातून या शेतकरी बांधवांचे सक्षमीकरण करण्याची धोरणात्मक बांधिलकी आम्ही या निमित्याने स्वीकारती व घोषणा करतो कि शेतकर्यांना मूल्याधारित बाजारपेठ व पिक संरक्षणाकरिता पिक विमा व कृषीक्षेत्राचे संघटन हे मुख्य उद्येश आहे.

सध्या आपण नित्य अनुभवतो आहे निष्पाप,निरपराध,स्त्रिया व अबोध मुली यांच्यावर होणारे लैंगिक,शारीरीक तसेच समाजात वावरत असताना नकोसे स्पर्श असे अत्याचार व चालीरीती रूढी या माध्यमातून होणारे लैंगिक शोषण यांना आपण वेळीच पायबंद घालू शकलो तर समाज मन आणि अर्धी लोकसंख्या आपण सुदृढ करू शकू असा विश्वास या निमित्याने देता येईल या करिता सामाजिक प्रबोधन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी भित्ती पत्रके,पोस्टर्स,जाहिराती यातून स्त्रियांविषयी निकोप व निरोगी दृष्टीकोन विकसित करणे,मा.सर्वोच्च न्यायालय यांनी विशाखा मार्गदर्शक तत्वे विहित केल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी,सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या महिलाप्रती नैतिक आदर व व्यक्तिगत आपलेपण यांची जोपासना अजुनहि समाजात अपवादात्मक परिस्थितीत चालू असलेले हुंड्याचे व्यवहार बालविवाह देवदासी प्रथा अश्या समाजातील अनिष्ट परंपरा संपविण्यासाठी घणाघाती नेतृत्व आम्ही विकसित करण्याची आपली भूमिका निश्चित करीत आहो. या जाहीर प्रगटनात आपण विषद केल्याप्रमाणे विकासाचा महामंत्र जनसामान्या पर्यंत पोह्चविण्यास्तव त्यांची भागीदारी व समर्थन हि काळाची गरज आहे सध्या विकासाची व्याख्या करताना आपण स्मार्ट सिटीवर जास्त जोर देत आहो वास्तविकता स्मार्ट सिटीपेक्षा अस्तित्वातील शहरांचा समतोल विकास व्हावा व त्यातून प्रभावी रोजगार निर्मिती व्हावी या संकल्पनेतून आम्ही अशी भूमिका मांडतो कि छोडो स्मार्ट सिटी अपनाओ मेट्रो सिटी या आमच्या घोषणेनुसार प्रभावी व वेगवान दळण वळण साधने सक्षम पायाभूत संरचना, सक्षम नागरी सोई व निरोगी वातावरण यांची निर्मिती प्रथमतः होणे गरजेचे आहे.

सध्या बकाल स्वरुपात वाढलेल्या शहरांमुळे व अविकसित अनधिकृत वस्त्यामुळे अस्तित्वातील जलसाठे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे मोठे अरिष्ट कोसळलेले आहे हे थोपविण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया तसेच अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे अत्यावश्यक आहे.सांडपाणी प्रक्रिया विकेंद्रित तत्वावर राबवून जसे छोट्या वस्तीमध्ये प्रक्रिया केंद्रे स्थापित करून तेथे जैविक खते व सांडपाण्याचा पुनर्वापर करणे शक्य झाले तर जलसाठ्यांचे प्रदूषण आपण टाळू शकू आणि कोळसाजण्य ज्वलनशील माध्यमातून उर्जा निर्माण करण्याचे प्रयत्न कमी करून सौर ऊर्जेसारख्या अव्याहत व सदैव उपलब्ध असलेल्या उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवून आपण प्रभावी पर्यावरण संतुलन साधू शकतो हि सुद्धा आमच्या कृती उद्येश्यांची एक रूपरेखा आहे.

आपला समाज अविकसित अर्ध शिक्षित व अल्प शिक्षित राहण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे शिक्षणाचा उचित प्रचार व प्रसार नसणे आणि उगवत्या पिढीकरिता हि साधने सहज उपलब्ध नसणे हि आहे वास्तविकता अबोध बालमनावर शिक्षणाचे सुसंस्कार घडवीत किंबहुना विनामुल्य व हमीपत्र तथा दर्जेदार शिक्षण आरोग्यपूर्ण वातावरणात उपलब्ध करवून देणे हे आमचे ध्येय असेल.

Copyright © KJPINDIA, 2018